राष्ट्रीय शिक्षण संस्थेची वार्षिक सर्वसाधारण जेष्ठ सभासदांच्या उपस्थितीत सभा संपन्न

राष्ट्रीय शिक्षण संस्थेची वार्षिक सर्वसाधारण जेष्ठ सभासदांच्या उपस्थितीत सभा संपन्न

चाळीसगाव;-(लोकशाही न्यूज नेटवर्क प्रतिनिधी) -चाळीसगाव-येथील अग्रगण्य राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात नानासाहेब य.ना.चव्हाण महाविद्यालयाच्या सभागृहात चेअरमन डॉ.विनायकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी संस्थेअंतर्गत विविध देणगीदार सभासद व पालकांचे आभार चिटणीस प्राचार्य बाळासाहेब चव्हाण यांनी मानले तसेच कळमडू विद्यालयाच्या इमारतीचे काम सुरु असून रांजणगाव येथील नविन वर्गखोल्या व प्रयोगशाळेचे काम पूर्ण झाले आहे असे सांगत संस्थेतील विविध विकास कामांचा आढावा त्यांनी घेतला नंतर आपल्या सखोल अध्यक्षीय भाषणात चेअरमन डॉ.विनायकराव चव्हाण यांनी विरोधकांच्या विविध आरोपांचा खरपूस समाचार घेत त्यांना समपर्क उत्तरे देत २० महिन्यांपासून आम्ही शिक्षक, विद्यार्थी व समाजासाठी विविध उपक्रम राबवित असल्याचे सांगून येणाऱ्या काळात संस्था समृद्धीचेच उद्दिष्ट असेल असे सांगितले तसेच मागील संचालक मंडळाने नियमबाह्य केलेली विविध कामे तसेच बोगस व बॕकडेटेड भरती प्रक्रिया, विषयानुसार बदली केलेल्या शिक्षकांना जळगाव जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाचे अधिकारी देत असलेला त्रास, राष्ट्रीय विद्यालयाची विकलेली बेकायदेशीर जागा,आपले अपयश लपविण्यासाठी विरोधकांनी कोर्टात नेलेली बेकायदेशीर १८ प्रकरणे,नाव न छापलेले निनावी व बिनबुडाचे पत्र व विविध मुद्द्यांवर यथोचित भाष्य करत त्यांनी सभागृह दणाणून सोडले यावेळी प्रत्येक मुद्द्यावर सभासद टाळ्या वाजवून व हात उंचावून दाद देत होते उल्लेखनीय म्हणजे सभेत ७५ ते ९० या वयोगटातील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच तालुक्यातील अनेक जेष्ठ सभासद तसेच सेवानिवृत्त मुख्याध्यापक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते,अहवाल वाचन व सूत्रसंचालन कार्यालयीन अधिक्षक रणधीर राजपूत यांनी केले तसेच ते अहवालातीलविविध विषय वाचून सभासदांची मंजुरी घेत असतांनाच सर्व सभासदांनी हात उंचावत सर्व विषय बहुमताने मंजूर असा एकमुखी आवाज दिल्याने सर्व विषय बहुमताने मंजूर करण्यात आले यावेळी व्यासपीठावर सर्वोदय शिक्षण संस्थेचे उदेसिंग मोहन पाटील तसेच चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष मिलिंद देशमुख,माजी मुख्याध्यापक ल.बा.सोनार,राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा पुष्पाताई भोसले,दुय्यम चिटणीस रावसाहेब साळुंखे,संचालक भैय्यासाहेब पाटील, आर्किटेक्ट धनंजयराव चव्हाण,अॕड.साहेबराव पाटील, भाऊसाहेब पाटील,प्रमोद पाटील, बारिकराव वाघ, अल्काताई बोरसे, शेनफडू पाटील,तात्यासाहेब निकम, सुनिल देशमुख,शरद मोराणकर,भूषण भोसले,महेश चव्हाण,हंसराज पाटील, सोनूसिंग राजपूत,अविनाश देशमुख, उज्वला पाटील,अनिल कोतकर,हरिश महाले आदी संचालक मंडळ तसेच सभासद बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व सभासदांना यावेळी वार्षिक अहवाल व अल्पोपहार वितरित करण्यात आला.