अमृत 1 चे काम घेणाऱ्या कॉन्ट्रॅक्टर ला काळ्या यादीत टाका मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन शिवसेनेने केले मागणी

भुसावळ : शहरात अमृत 1पाणी पुरवठा योजना याआधी अपूर्ण अवस्थेत आहे. त्या साठी शासनाने 65 कोटी रु मंजूर केलेले होते. ती योजना आज 9वर्ष झाली तरी सुध्धा कॉन्ट्रॅक्टर ने ती योजना पूर्ण केलेली नाही . त्या मुळे ह्या कॉन्ट्रॅक्टर ला काळ्या यादीत टाकून यांची अनामत रक्कम जप्त करण्यात यावी. व महाराष्ट्र शासनाने भुसावळ साठी अमृत 2ही 137 कोटीची योजना मंजूर केलेली आहे त्या योजनेचे टेंडर निघालेले आहे अमृत 2 योजना लवकरात लवकर व्हावी , यासाठी हे काम सक्षम व दर्जेदार कॉन्ट्रॅक्टर देण्यात यावे , अशी मागणी शिवसेनेचे शहर प्रमुख दीपक धांडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे. अन्यथा कोट्यवधी रुपयाची ही योजना अपयशी ठरल्यास पाण्यात जाईल . व शहरातील नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.तरी हे काम सक्षम कॉन्ट्रॅक्टर लाच देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे आहे. यावेळी शिवसेना शहर प्रमुख दिपक धांडे,निलेश महाजन,बबलू ब-हाटे , माजी नगरसेवक मुकेश माजी नगरसेवक प्पू बारसे,दिलीप सुरवाडे,राजू इंगळे,नरेंद्र लोखंडे,रहीम गवळी,अबरार ठाकरे,जितू पाटील,शरद जैस्वाल,पिंटू भोई,सूरज पाटील,बबलू धनगर,शरद जोहारे,रिंकू भोई,शिवसैनिक उपस्थित होते