अमळनेर विधानसभा निवडणुकीत माघारी नंतर 12 उमेदवार रिंगणात

अमळनेर (प्रतिनिधी):-
अमळनेर विधानसभा निवडणूकीसाठी एकुण १६ उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. सोमवारी ४ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत एकुण ४ उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे १२ उमेदवार जरी निवडणुकीच्या रिंगणात असले तर खरी लढत ही तिरंगी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
यात काँग्रेसकडून डॉ. अनिल नथ्थु शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अनिल भाईदास पाटील, अनिल भाईदास पाटील (अपक्ष), सचिप अशोक बाविस्कर (अपक्ष), अमोल रमेश पाटील (अपक्ष), छबिलाल लालचंद्र भिल (अपक्ष), निंबा धुडकू पाटील (अपक्ष), प्रतिभा रवींद्र पाटील (अपक्ष), यशवंत उदयसिंग मालची (अपक्ष), रतन भानू भिल (अपक्ष), शिरीष हिरालाल चौधरी (अपक्ष), शिवाजी दौलत पाटील (ऑटो रिक्षा) असे एकूण बारा उमेदवार आहेत. तर कैलास दयाराम पाटील, अशोक लोटन पवार, जयश्री अनिल पाटील, प्रथमेश शिरीष चौधरी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.