सामाजिक
राष्ट्रीय चर्मकार संघ २९ वा वर्धापन दिनानिमित्त ग्रामीण रुग्णालय व मुक बधीर शाळेत फळवाटप

भडगांव – प्रतिनिधी
राष्ट्रीय चर्मकार महासंघ २९ वा वर्धापन दिनानिमित्त महासंघाचे तालुकाध्यक्ष रविंद्र अहिरे, चर्मकार महासंघाच्या महीलाध्यक्षा लता अहिरे, यांचे प्रमुख उपस्थितीत भडगाव ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना व मुक बधीर शाळेत विद्यार्थ्यांना फळ वाटप करण्यात आले, सदर प्रसंगी पाचोरा पोलिस स्टशनचे ए.एस.आय. दिलीप अहिरे, उपाध्यक्ष मधुकर वाघ, युवाध्यक्ष सुधीर अहिरे, ता. संघटक संजय शेवाळे, शहर संघटक दगडु गायकवाड, शेतकरी संघ संचालिका मा. नगरसेविका योजना पाटील, निवृत्त आर्मी अधिकारी दिलीप वाघ, साहेबराव पाटील, शिवाजी शिरसाठ, सरदार राठोड, रावसाहेब अहिरे, गणेश अहिरे, हेमंत अहिरे, मा. प्राचार्य डी. डी. पाटील सह ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. मुंडे, मुक बधीर शाळेचे मुख्याध्यापक किशोर पाटील सह अधिकारी कर्मचारी वृंद, संघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.