एरंडोल पारोळा विधानसभा मतदारसंघात १३ उमेदवार रिंगणात

पारोळा —प्रतिनिधी
एरंडोल पारोळा विधानसभा मतदारसंघात
आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी
२० पैकी ७ उमेदवारांनी माघार घेतली असून या मतदारसंघात आता
१३ उमेदवार रिंगणात आहेत
यात शिवसेना शिंदे गटाचे शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश पाटील, शिवसेना शिंदे गटाचे अमोल पाटील,तसेच
अपक्ष म्हणून संभाजीराजे पाटील,ए टी नाना पाटील, भगवान महाजन,
डॉ हर्षल माने, अमित पाटील, अरुण जगताप, स्वप्निल पाटील,दत्तु पाटील, सुनिल मोरे, अण्णासाहेब सतीश पवार,प्रशांत पाटील स्वाभिमानी पक्ष यांनी आप आपली उमेदवारी कायम ठेवली आहे
अपक्ष उमेदवारांची मात्र या मतदारसंघात भाऊ गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे या भाऊ गर्दीत कोणाचे नशीब बलवत्तर हे येणार काळच ठरवेल तो पर्यंत मात्र वाट पाहावी लागणार आहे या सर्व उमेदवारांना आज चिन्ह वाटप करण्यात आले
यांच्यात होणार खरी लढत
१३ पैकी ६ उमेदवारांत खरी लढत होणार असल्याचे बोलले जात आहे यात डॉ सतीश पाटील, अमोल पाटील,ए टी नाना पाटील, डॉ संभाजीराजे पाटील, भगवान महाजन, डॉ हर्षल माने, यांच्यात एरंडोल पारोळा विधानसभा मतदारसंघात खरा सामना रंगणार असल्याचे माघारी नंतर चित्र स्पष्ट झाल्याने सांगितले जात आहे.