जळगाव ग्रामीण मतदार संघात शिंदे गटाचा उबाठा गटाला मोठा दणका शेकडो शिवसैनिकांनी केला शिवसेनेत प्रवेश..!

जळगाव- राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार ना.गुलाबराव पाटील यांच्या सामाजिक बांधिलकी, सर्व समाजाला न्याय देण्याहेतू सुरु असलेले अथक प्रयत्न, सामान्यांप्रती असलेली आपुलकी, सामान्य कार्यकर्त्यांची जाण, व सर्व क्षेत्रात सुरू असलेल्या विकास कामांचा झंजावत तसेच मतदार संघातील सर्व समाजाचा विविध समाज मंदिरांकरिता केलेल सहकार्य पाहून जळगाव ग्रामीण मतदारसंघातील उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेतील शेकडो शिवसैनिकांनी आज शिवसेनेत पक्षप्रवेश केला.
शिरसोली,ममुराबद, भोने,अहिरे बिलवाडी,लमांजन, गारखेडा,चावळखेडा,सुभाषवाडी कुऱ्हाळदा,भागपूर ,लोणवाडी येथील नागरिकांनी शिवसेनेत प्रवेश केला तसेच ना.गुलाबराव पाटील यांना आगामी निवडणुकीत एक लाखाच्या मताधिक्क्याने विजयी करण्याचा संकल्प केला.
प्रसंगी मुस्लिम समाज बांधवांनी उपस्थिती देत आगामी काळात सहकार्य करण्याचे दिले वचन..!
तसेच पाळधी येथील संपूर्ण मुस्लिम पंच कमिटी यांनी विधानसभेत संपूर्ण सहकार्य करण्याचे वचन दिले.
प्रसंगी माजी सभापती कैलास चौधरी,मुकुंदराव नन्नवरे, संजय पाटील सर ,तालुका प्रमुख डी ओ पाटील,दीपक भदाणे, जि .प सदस्य गोपाळ बापू पाटील शाम कोगटा, मनोज चौधरी,रोहित कोगटा ,महानगर प्रमुख संतोष पाटील ,ओबीसी अध्यक्षय राजेंद्र पाटील पिंटू भाऊ,नंदू आबा पाटील,बबन भाऊ, धोंडू भाऊ जगताप बंडू पाटील,भैया मराठे सर,सरपंच विजू बापू पाटील दोन गाव चे सरपंच भागवत शेठ, पवन पाटील,कैलास सोनवणे किशोर निकम,शुभम पाटील गोरख पाटील ,यांच्या सह मतदारसंघातील महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते,,