धरणगावात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले प्रवेशद्वाराचा लोकार्पण सोहळा उत्साहात !

धरणगाव (प्रतिनिधी) येथील माळी समाज पंच मंडळ, लहान माळी वाडा व सांवता माळी समाज सुधारक मंडळ मोठा माळी वाडा यांच्या उपस्थितीत ना.गुलाबराव पाटील यांचा विकास निधीतून धरणगाव एरंडोल रोडावरील बत्तीस लाख रुपयांचा उभारण्यात आलेल्या प्रवेशदाराचा लोकार्पण सोहळा फटाक्याची आतिषबाजी करीत जिल्हयाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा हस्ते संपन्न झाला.
प्रारंभी ना गुलाबराव पाटील यांचे सांवता माळी समाज सुधारक मंडळ मोठा माळीवाडाचे अध्यक्ष विठोबा महाजन,समस्त माळी समाज पंच मंडळ लहान माळीवाड्यातील अध्यक्ष रामकृष्ण महाजन,सह पंच मंडळाकडून त्याचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. शहरात ना.गुलाबराव पाटील यांचा विकास निधीतून धरणगाव ते जळगाव रोडावर छत्रपती शिवराय यांचे प्रवेशद्वार तर धरणगाव चोपडा रोडावर जय संताजी महाराज या नांवाने प्रवेशद्वार उभारण्यात आले आहेत. त्यापैकी पुर्वी शिव छत्रपती शिवाजी महाराज यांचा नावाने उभारण्यात आलेला प्रवेशद्वाराचा लोकार्पण सोहळा मागील वेळेस संपन्न झाला होता व आज एरंडोल रोडावरील महात्मा ज्योतिराव फुले यांचा नावाने उभारण्यात आलेला प्रवेशद्वाराचे उद्घाटन व लोकार्पण करण्यात आला.
तिघे प्रवेशद्वाराचे एक कोटी रुपया पेक्षा अधिक निधी उपलब्ध करून बांधकाम पूर्ण झालेले आहे. शहरातील ह्या तिघेही प्रवेशद्वार संत व महात्म्यांचा नावाने उभारण्यात आल्याने शहराचा सौंदर्यात भर पडत असून समाजात ना गुलाबराव पाटील यांचे कौतुक होत आहे. सदर लोकार्पण सोहळा कार्यक्रमात समस्त माळी,पाटील,तिळवण तेली व क्षत्रिय सुर्यवंशी मराठे समाजा चे अध्यक्ष व पंच मंडळ सह विविध प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते