महाविकास आघाडीत काँग्रेसने मोठा भाऊ बनत केला शंभरीचा आकडा पार…

मुंबई: विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत जवळ आली आहे. मंगळवारपर्यंत राज्यातील सर्व २८८ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. मात्र, जागावाटपावरून महाविकास आघाडीत अद्यापही रस्सीखेच सुरूच आहे.
महाविकास आघाडीत जागावाटपावरून आतापर्यंत झालेल्या वाटाघाटीचा सर्वाधिक फायदा काँग्रेसला झाल्याचे चित्र आहे.
महाविकास आघाडीत काँग्रेसने मोठा भाऊ बनून शंभरी पार केली आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जवळपास ९० जागांवर समाधान मानावे लागू शकते. नवीन वाटाघाटीनंतर काँग्रेस १०२ जागांवर निवडणूक लढवू शकते, असे बोलले जात आहे. महाविकास आघाडीत जागा वाटपावरून रविवारी रात्री उशिरापर्यंत ओढाताण सुरू होती. राजकीय पंडितांनी पूर्वी व्यक्त केलेला ८५+८५+८५ या सूत्राचा अंदाज केवळ कल्पनाविलास ठरला आहे.
आतापर्यंत काँग्रेसने पहिल्या यादीत ४८, दुसऱ्या यादीत २२ आणि तिसऱ्या यादीत महाआघाडीत २८, तर महायुतीत ५३ जागांचा पेच आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस केवळ तीन दिवसांवर आला आहे. असे असताना राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांपैकी २६० जागांवर महाविकास आघाडीने, तर २३५ जागांवर महायुतीने आपले उमेदवार जाहीर केले
आहेत. महाविकास आघाडीत २८, तर महायुतीत ५३ जागांची घोषणा होणे अद्याप बाकी आहे.
महाविकास आघाडीत काँग्रेसने आतापर्यंत १०१ (४८+२३+१६+१४), राष्ट्रवादी (शप) पक्षाने ७६ (४५+२२+९), तर शिवसेना (उबाठा) पक्षाने ८३ (६५+१५+३) असे एकूण २४६ उमेदवार जाहीर केले आहेत. महायुतीत भाजपाने १२१ (९९+२२), राष्ट्रवादी काँग्रेसने ४९ (३८+७+४) आणि शिवसेना शिंदे गटाने ६५(४५+२०) उमेदवारांची घोषणा केली आहे. १८ उमेदवारांची तर रविवारी १४ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने ७६ उमेदवार (पहिल्या यादीत ४५, दुसऱ्या यादीत २२ आणि तिसऱ्यामध्ये उमेदवारांची घोषणा केली आहे.