जळगाव जिल्ह्यात ‘सर्वसामान्यपणाच्या राजकारणा’त चर्चेत असलेलं नाव — प्रतापराव पाटील
पाळधी | प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात सध्या एक वेगळीच आणि ठळक चर्चा आकार घेत आहे. सत्ता मिळताच माणसांपासून तुटणं, पद मिळताच कार्यकर्त्यांकडे वरून पाहणं आणि अधिकारांचा माज—हीच जणू राजकीय ओळख बनत असताना, प्रतापराव पाटील यांचं साधं, सर्वसामान्य आणि कार्यकर्ताकेंद्री वागणं जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे.
जीपीएस मित्रपरिवाराच्या अलिबाग सहलीदरम्यान प्रतापराव पाटील यांनी कोणताही पदाचा बडेजाव न करता अगदी सामान्य कार्यकर्त्याप्रमाणे वागणूक दिली. कार्यकर्त्यांसोबतच प्रवास, त्यांच्यासोबत क्रिकेट खेळणं, जे ते खात होते तेच खाणं आणि ज्या ठिकाणी मित्रपरिवाराचा मुक्काम होता त्याच ठिकाणी थांबणं—हे दृश्य आजच्या अहंकारी राजकारणात दुर्मिळच म्हणावं लागेल.
जळगाव जिल्ह्याने अनेकदा पाहिलं आहे की एखादी व्यक्ती सरपंच झाली तरी तिच्या वागण्यात जमीन-अस्मानाचा फरक पडतो. अशा परिस्थितीत स्वतः जिल्हा परिषद सदस्य असताना आणि राज्याचे प्रभावी मंत्री गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव असूनही प्रतापराव पाटील यांचं हे साधेपण अनेकांच्या भुवया उंचावणारं ठरत आहे. हे आश्चर्य केवळ मतदारसंघापुरतं मर्यादित न राहता संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे.
अलिबाग सहलीतील प्रत्येक प्रसंग आजही मित्रपरिवारात आवर्जून सांगितला जातो आहे. “एखादी-दोन घटना नव्हे, तर त्यांचं संपूर्ण वागणंच सांगण्यासारखं आहे,” असं सहभागी कार्यकर्ते अभिमानाने सांगतात. या सहलीतून आणखी एक बाब ठळकपणे समोर आली—ती म्हणजे त्यांचा निर्व्यसनी, संयमी आणि स्वच्छ चारित्र्याचा स्वभाव. राज्यातील बड्या नेत्याचा मुलगा असूनही अगदी साध्या सुपारीचाही शौक नसणं, हा अनुभव कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण करणारा ठरला.
सेवाभाव हा प्रतापराव पाटील यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहे. दरमहा नेत्र तपासणी शिबिरे, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, दु:खद प्रसंगी तातडीची आर्थिक मदत, मंडप, खुर्च्या व आवश्यक साधनसामग्री—सुख-दु:खात सातत्याने सोबत उभा राहणारा नेता म्हणून त्यांनी जळगाव ग्रामीण भागात ठाम ओळख निर्माण केली आहे.
पाण्याच्या बाटलीपासून जेवण, निवास व्यवस्था, प्रत्येकाची अडचण ऐकून घेणं आणि सूचना अमलात आणणं—ही कार्यपद्धती आज अनेक तथाकथित नेत्यांसाठी आरसा ठरत आहे. चूक झाली तरी राग न करता समजून घेणारा आणि मार्ग काढणारा नेता आजच्या राजकारणात दुर्मिळ होत चालला आहे.
यामुळेच कार्यकर्त्यांमध्ये एक ठाम भावना व्यक्त होत आहे—
पाळधी जिल्हा परिषद गटापुरतंच नव्हे, तर संपूर्ण जळगाव जिल्ह्याला असा युवा, संवेदनशील आणि कार्यकर्ताभिमुख नेता मिळणं ही काळाची गरज आहे.
ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांशी कसं वागावं, विकास कसा करावा आणि माणुसकी कशी जपावी—याचा वस्तुपाठ प्रतापराव पाटील यांनी आपल्या कृतीतून दिला आहे, हेच आज जळगाव जिल्ह्यात स्पष्टपणे बोललं जात आहे.
आपलाच सहलीतील मित्र
✍️ भूषण महाजन
मुख्य संपादक माळी साम्राज्य


