सावदा येथे दोन लाखांचा गुटखा जप्त ; दोन जण ताब्यात

सावदा प्रतिनिधी –
महाराष्ट्र शासनाने राजपत्राद्वारे उत्पादन, विक्री, वितरण, व साठा तसेच वाहतुक यासाठी प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखु व विमल गुटखा हा कब्जात बाळगुन पुरवठा करणेसाठी वाहतुक करतांना दोन आरोपींविरुध्द सावदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सावदा पोलीस स्टेशन हद्दीत आरोपी नामे 1) अनिल ओंकार पाटील, वय-40, रा.शिवाजीनगर जळगाव., 2) रोहीत मुकेश बरकले, वय-22, रा.शिवपुर, ता.भुसावळ हे सुगंधीत तंबाखु व विमल गुटखा हा कब्जात बाळगुन पुरवठा करणेसाठी वाहतुक असलेबाबतची गोपनिय बातमी सहा.पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांना मिळाल्याने त्यांनी तात्काळ सावदा पोलीस स्टेशनकडील पोलीस पथकास रवाना करुन आरोपी यांचेवर सापळा रचुन आरोपी यांना लुमखेडा ता.रावेर शिवारात सावदा ते हतनुर धरण रोडवर पाटाचे चारीजवळ पकडुन त्यांचेजवळ (दोन लाख पाचशे साठ) 2,00,560/- रुपये किंमतीचा सुगंधीत तंबाखु व विमल गुटखा मोटार सायकलीसह मिळुन आल्याने त्यांचे विरुध्द सावदा पोलीस स्टेशन गुरन-194/2024,भारतीय न्याय संहीता सन 2023 चे कलम-123, 274, 275, 3(5), 223 प्रमाणे गुन्हा दि.24/09/2024 रोजी दाखल करुन त्यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. सदरची कामगिरी हि सहा.पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनिरीक्षक राहुल सानप,पोहेकाँ.2472 संजीव चौधरी,पोकाँ.1415 सुनिल कुरकुरे,पोकाँ.2521 बबन तडवी यांनी केलेली आहे