जिपीएस मित्र परिवारच्या नेत्र शिबिराला अभूतपूर्व प्रतिसाद – ८१० रुग्णांची तपासणी, २१० रुग्ण शस्त्रक्रियेसाठी रवाना
पाळधी / धरणगाव प्रतिनिधी दि. ७ नोव्हेंबर - पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रेरणेतून तसेच तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील आणि विक्रम पाटील यांच्या प्रयत्नातून जिपीएस मित्र परिवार तर्फे आयोजित भव्य नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला आज पाळधी येथे प्रचंड प्रतिसाद लाभला.
*जिपीएस मित्र परिवारच्या नेत्र शिबिराला अभूतपूर्व प्रतिसाद – ८१० रुग्णांची तपासणी, २१० रुग्ण शस्त्रक्रियेसाठी रवाना*

*पाळधी / धरणगाव प्रतिनिधी दि. ७ नोव्हेंबर – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रेरणेतून तसेच तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील आणि विक्रम पाटील यांच्या प्रयत्नातून जिपीएस मित्र परिवार तर्फे आयोजित भव्य नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला आज पाळधी येथे प्रचंड प्रतिसाद लाभला.*

या शिबिरात ८१० रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली, त्यापैकी २१० रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करून त्यांना पनवेल येथील सुप्रसिद्ध शंकरा नेत्र रुग्णालयात रवाना करण्यात आले. सकाळी सातपासूनच गावागावातून आलेल्या नागरिकांनी तपासणीसाठी मोठी गर्दी केली होती. रुग्णांची नोंदणी, तपासणी आणि पुढील उपचाराची व्यवस्था अत्यंत शिस्तबद्धपणे पार पडली.
*पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा कोट*
समाजात अनेक वेळा पैशाअभावी किंवा जागृतीअभावी रुग्णांना उपचार मिळत नाहीत. या शिबिरातून प्रत्येकाला नव्या प्रकाशाची, नव्या आशेची दृष्टी मिळावी हीच खरी देवसेवा आहे.
*पालकमंत्री गुलाबराव पाटील*
शिबिरात आलेल्या सर्व रुग्णांसाठी नाश्ता आणि जेवणाची मोफत व्यवस्था करण्यात आली होती. कोणत्याही रुग्णाकडून मोबदला न घेता संपूर्ण सेवा संपूर्णपणे नि:शुल्क देण्यात आली. या सेवाभावी उपक्रमासाठी डॉ. राहुल चौधरी, डॉ. विजय बामणे, डॉ. रामदास पवार, डॉ. साक्षी चिनके, डॉ. श्रुती शर्मा, डॉ. समृद्धी साळवी, डॉ. भूपेंद्र वाघ, डॉ. अक्षय पारधी आणि पाळधी आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारीवर्ग, तसेच जिपीएस मित्र परिवार आणि शिवसेना युवासेना कार्यकर्त्यांनी अपार परिश्रम घेतले.
ग्रामस्थांनी या दृष्टीदान शिबिराबद्दल भावनिक प्रतिक्रिया देताना म्हणाले की, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची आता ‘दृष्टी देणारा बाबा’ म्हणून नवी ओळख निर्माण होत असून त्यांच्या प्रेरणेतून सुरू झालेला हा सेवायज्ञ आमच्यासाठी वरदान ठरत असल्याचे

सांगितले.




