ताज्या बातम्या

“गरिबांच्य दारात आरोग्य”हजारोंच्या साक्षीने ‘मायेच्या दृष्टी’चा शुभारंभ

बाळासाहेबांच्या जयंतीदिनी ‘दृष्टीदान’चा संकल्प : दोन वर्षांत ३३ शिबिरांतून १०,९४० रुग्णांना नवी दृष्टी


पाळधी / जळगाव प्रतिनिधी :
सेवा हेच शिवसेनेचे खरे व्रत असून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्यसेवा पोहोचलीच पाहिजे, हेच हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. आज जीपीएस मित्र परिवाराच्या नेत्र तपासणी ॲम्बुलन्सच्या माध्यमातून गरिबांच्या दारात आरोग्य पोहोचत असून हीच बाळासाहेबांना खरी मानवंदना आहे. जोपर्यंत समाजातील शेवटचा माणूस सुखरूप होत नाही, तोपर्यंत ही सेवा अखंड सुरू राहील, असा निर्धार पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पाळधी येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जीपीएस मित्र परिवाराच्या अत्याधुनिक नेत्र तपासणी ॲम्बुलन्सचे लोकार्पण तसेच विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
हजारो नागरिकांच्या उपस्थितीमुळे या लोकार्पण सोहळ्याला भव्य सभेचे स्वरूप आले होते. “बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद”, “जय भवानी, जय शिवराय” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली “जनतेचे विश्वासू आरोग्यदूत” म्हणून ओळखले जाणारे जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील व विक्रम पाटील यांच्या पुढाकारातून जीपीएस मित्र परिवाराने आतापर्यंत
👉 ३३ मोफत नेत्र तपासणी शिबिरे,
👉 २९,२६० रुग्णांची तपासणी,
👉 १०,९४० मोतिबिंदू शस्त्रक्रिया
यशस्वीरीत्या पार पाडून हजारो कुटुंबांच्या आयुष्यात दृष्टीचा प्रकाश पेरला आहे. उपस्थित नागरिकांनी “पालकमंत्री गुलाबराव पाटील हे आमच्यासाठी खऱ्या अर्थाने दृष्टीदाता आहेत,” अशा भावना व्यक्त केल्या.
आतापर्यंत रुग्णांना तपासणीसाठी पाळधी येथे यावे लागत होते. मात्र ग्रामीण भागातील वृद्ध, गरजू व अशक्त रुग्णांची गैरसोय लक्षात घेऊन आता ही अत्याधुनिक ॲम्बुलन्स थेट गावोगावी जाऊन नेत्र तपासणी करणार आहे. तपासणीनंतर आवश्यक रुग्णांना पुढील उपचार व शस्त्रक्रियेसाठी पाठवले जाणार असून ही सेवा सर्वसामान्यांसाठी ‘मायेची दृष्टी’ ठरणार असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
विकासकामांना वेग – गावागावात प्रगतीचा धडाका
पोखरी, पोखरी तांडा, पाळधी बु. व पाळधी खु. येथे
पोखरी–वराड रस्त्याचे डांबरीकरण,
गावांतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण,
मराठी व उर्दू शाळांसाठी नवीन खोल्या,
पाळधी खुर्द येथे संविधान भवन,
ठिकठिकाणी ब्लॉक बसविणे,
अल्पसंख्याक समाजासाठी शादीखाना हॉल,
एलईडी पथदिव्यांचे लोकार्पण
अशा विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कामांमुळे परिसराच्या पायाभूत सुविधांना मोठी चालना मिळणार आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जि. प. सदस्य प्रतापराव पाटील यांनी केले. त्यांनी जीपीएस ग्रुपमार्फत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक, आरोग्य व शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. सूत्रसंचालन प्रशांत झंवर यांनी केले, तर आभार विक्रम पाटील यांनी मानले.
प्रमुख उपस्थिती :
पाळधी बु. सरपंच विजय पाटील, पाळधी खु. सरपंच लक्ष्मीबाई शरद कोळी, उद्योजक शरद कासट, दिलीप बापू पाटील, उपसरपंच निसार शेख, शमिना शरीफ देशपांडे, तालुका प्रमुख डी. ओ. पाटील, शिवराज पाटील, माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, सचिन पवार, माजी जि. प. सदस्य गोपाळ चौधरी, पवन सोनवणे, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील, भाजपचे माजी जि. प. उपाध्यक्ष पी. सी. आबा पाटील, माजी जि. प. सदस्य सौ. माधुरीताई अत्तरदे, भाजप तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, किशोर झंवर, जिजाबराव पाटील, तालुका सरचिटणीस माधव पाटील, निर्दोष पवार, शिवसेना तालुका संघटक रवींद्र चव्हाण, चिंचपुरा सरपंच कैलास पाटील, माजी कृ. उ. बा. उपसभापती संजय पवार, उपनगराध्यक्ष पंकज महाजन, सभापती विकास पाटील, नातेश्वर पवार, कृ. उ. बा. समिती सभापती प्रेमराज पाटील, नंदलाल पाटील, जनाआप्पा कोळी, शेतकी संघ सभापती गजानन पाटील, माजी पंचायत समिती सभापती अनिल पाटील व राजू पाटील, तसेच धरणगाव नगरसेवक, शिवसेना, युवासेना व जीपीएस मित्र परिवाराचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button