कौतुकास्पद; कावपिंप्री येथील चार तरुण एकाचवेळी सैन्यदलात भरती

अमळनेर (प्रतिनिधी):-
तालुक्यातील कावपिंप्री / इंद्रापिंप्री गावातील चार तरुण एकाच वेळी भारतीय सैन्य दलात भरती झाल्याने सैन्यभरतीची तयारी करणाऱ्या तरूणाईसाठी ते प्रेरणादायी ठरले आहे. यात दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे, विशेष म्हणजे सर्वच तरुण सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. या चारही तरुणांचा गावकऱ्यांनी सत्कार केला.
गौरव राजेंद्र पाटील हा सहा महिन्यांपूर्वी सैन्य दलात भरती झाला असून तो सध्या जम्मू येथे प्रशिक्षण घेत आहेत, तर त्याचा सख्खा लहान भाऊ सौरव रवींद्र पाटील, राजेश दिपक पाटील, हितेश विश्वास पाटील आणि शुभम अनिल पाटील या चारही तरुणांची छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या सैन्य दलाच्या भरतीत एकाच वेळी निवड झाल्याने त्यांच्या परिवारासह गावात आनंदाचे वातावरण आहे. पदवी पर्यंतचे शिक्षण घेऊन शासकीय नोकऱ्या मिळत नसल्याने गावागावात विद्यार्थी मोठ्या संख्येने भरतीची तयारी करतात. त्यातून काहींची निवड होते अन तेच तरुण इतरांसाठी प्रेरणादायी ठरतात. भारतीय सैन्य दलात दाखल झालेल्या तरुणाचे अभिषेक पाटील मित्र परिवाराकडून व ग्रामस्थांकडून अभिनंदन व कौतुक होत आहे.