ताज्या बातम्या
जळगाव ग्रामीण दिनदर्शिकेचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून अवलोकन
पाळधी, ता. धरणगाव – जळगाव ग्रामीण मतदार संघात सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरलेल्या जळगाव ग्रामीण दिनदर्शिकेचे आज राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जळगाव ग्रामीणचे आमदार मा. ना. गुलाबरावजी पाटील यांनी अवलोकन केले.
या वेळी दिनदर्शिकेतील मतदार संघाचा सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय आढावा पाहून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी समाधान व्यक्त केले. जळगाव ग्रामीण मतदार संघातील कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी व सर्वसामान्य जनतेला एकत्र बांधणारी ही दिनदर्शिका उपयुक्त ठरेल, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
या प्रसंगी सचिन पवार, आबा माळी, गोकुळ नन्नवरे, भूषण महाजन, बंडू काका नारखेडे, प्रसाद शिंदे, सुरेश पाटील यांच्यासह अनेक मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.



