ताज्या बातम्या
मा. जि. प. सदस्य प्रतापराव पाटील यांच्या हस्ते जळगाव ग्रामीण मतदारसंघ दिनदर्शिका २०२६चे प्रकाशन
पाळधी (ता. धरणगाव) : आज श्रीक्षेत्र पद्मालय येथे जळगाव ग्रामीण मतदारसंघ दिनदर्शिका २०२६चे प्रकाशन संपन्न झाले.
जळगाव ग्रामीण मतदारसंघाचे भविष्य व कार्यकर्त्यांचे लाडके युवा नेतृत्व, मा. जिल्हा परिषद सदस्य प्रतापरावजी पाटील यांच्या शुभहस्ते सदर दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी उद्योजक अनिल कासट, सामाजिक कार्यकर्ते पिंटू कोळी, पत्रकार तथा दिनदर्शिकेचे संपादक भूषण महाजन यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.
जळगाव ग्रामीण मतदारसंघातील सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय घडामोडींचे दर्शन घडविणारी ही दिनदर्शिका कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.



