ताज्या बातम्या
धरणगावात महायुतीच्या उमेदवार वैशालीताई भावे १७ रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार..!
धरणगाव : महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. वैशालीताई विनय (पप्पू) भावे या आज, सोमवार १७ नोव्हेंबर २०२५ रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यासाठी शिवसेना–भाजप–राष्ट्रवादी महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
अर्ज दाखल कार्यक्रम सकाळी ९.३० वाजता माजी नगराध्यक्ष सलीम भाई पटेल यांच्या कार्यालयात, आठवडे बाजार परिसरातील शंकर स्वामी मंदिरासमोर आयोजित करण्यात आला आहे.
महायुतीच्या घटक पक्षांनी शहरातील नागरिक, समर्थक व पदाधिकाऱ्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
शहरात निवडणूक रंगत चढत असून भावे यांच्या अर्ज दाखल कार्यक्रमास जोरदार प्रतिसाद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.




