प्रतापराव पाटील यांच्या समाजसेवेने निराधारांच्या घरात पोहोचला दिवाळीचा आनंद
जीपीएस मित्र परिवार आयोजित; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घरोघरी जाऊन वाटप
पाळधी (ता. धरणगाव, जि. जळगाव) – दिवाळीच्या पावन सणाच्या निमित्ताने प्रतापराव पाटील यांनी आपल्या पारंपरिक समाजसेवेचा एक अनोखा उपक्रम राबवला. जीपीएस मित्र परिवार या संस्थेच्या आयोजित कार्यक्रमात त्यांनी घरोघरी जाऊन गावातील निराधार आणि गरजू नागरिकांना फटाके, फराळ व मिठाई वाटप केली.

कार्यक्रम पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. प्रतापराव पाटील यांच्यासह स्थानिक स्वयंसेवी संस्था, युवा मंडळ आणि गावातील नागरिकांनी सहभाग घेतला. त्यांनी घराघरात जाऊन निराधारांना आवश्यक वस्तू आणि दिवाळीचे फटाके वितरित केले, ज्यामुळे सणाचे वातावरण आनंदपूर्ण आणि उत्साही झाले.
प्रतापराव पाटील यांनी सांगितले, “दिवाळी हा सण आपण फक्त आपल्या कुटुंबीयांसोबत नाही, तर समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत आनंद पोहोचवण्यासाठी साजरा केला पाहिजे. निराधारांच्या चेहऱ्यावर हास्य आणणे हेच खरी सणाची खरी मजा आहे.”
गावातील नागरिकांनी या उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक केले आणि अशा समाजसेवेच्या माध्यमातून स्नेह, ऐक्य व सामाजिक जबाबदारी वाढवण्याची अपेक्षा व्यक्त केली. घरोघरी जाऊन करण्यात आलेल्या वाटपामुळे दिवाळीच्या सणाला एक वेगळाच अर्थ प्राप्त झाला.



