जीपीएस मित्रपरिवार आयोजित, दिपावली स्नेह मिलन सोहळा उत्साहात संपन्न..!
एकात्मता, स्नेह व हजारो समाजबंध यांचा अविस्मरणीय संगम

पाळधी (ता. धरणगाव) – दिवाळी व पाडव्याच्या शुभसंधीवर G.P.S. मित्र परिवार तर्फे आयोजित “दिपावली स्नेह मिलन सोहळा” हा कार्यक्रम दिमाखात व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. सामाजिक ऐक्य, परस्पर स्नेह व तरुणाईचा उत्साह यांचा सुंदर संगम या सोहळ्यात अनुभवायला मिळाला.

या कार्यक्रमाचे मार्गदर्शक ना.गुलाबराव पाटील (पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच पालकमंत्री, जळगाव जिल्हा), प्रतापराव पाटील (जि.प. सदस्य, जळगाव) व विक्रम गुलाबराव पाटील (युवा उद्योजक) यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष ऊर्जादायी व प्रेरणादायी वलय लाभले.
शिवसेना व युवासेना पाळधी शहर, प्रतापराव पाटील मित्र परिवार तसेच विक्की बाबा युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा अत्यंत उत्कृष्ट आयोजनात पार पडला.
संध्याकाळी चार वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या या कार्यक्रमात पाळधी परिसरासह जिल्हाभरातून राजकीय, सामाजिक, शासकीय, विविध मान्यवर, ग्रामस्थ व तरुण मंडळींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. उपस्थितांनी दिवाळीच्या शुभेच्छा देवून परस्पर स्नेहबंध दृढ केले.
या स्नेह मिलनाने पाळधी परिसरात आनंद, ऐक्य व सामाजिक जाणीवेचा उजेड अधिक प्रखर केला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जीपीएस मित्र परिवारातील सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.



