जिल्हा उद्या जळगावात शिक्षक सेनेतर्फे ग.स. सभासद स्वाक्षरी अभियान , तालुका एक शाखा एक करण्याची मागणी..!
कर्मचार्यांवर 1 कोटी 4 लाखांची उधळपट्टी कशासाठी- नाना पाटील यांचा सवाल

जळगाव- जिल्ह्यात ग.स.सोसायटीच्या 15 तालुक्यात 56 शाखा असून 264 कर्मचारी कार्यरत आहेत. अतिरिक्त कर्मचारी ठेवून त्याच्यांवर होणारी उधळपटी थांबवून प्रत्येक तालुक्यात एकच शाखा ठेवावी. सभासदांना सरसगट कर्ज माफी द्या, अशी मागणी जळगाव जिल्हा शिक्षक सेनेचे जिल्हा सरचिटणी नाना पाटील यांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत केली.
यावेळी जळगाव जिल्हा शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र सपकाळे, जिल्हा संघटक रमेश बोरसे, जिल्हा उपाध्यक्ष सचिन सरकटे, एरंडोल तालुकाध्यक्ष भूषण पाटील, एरंडोल तालुका सरचिटणीस राकेश साळुंखे, निलेश पाटील यावल, किशोर नेटके चोपडा , राजेंद्र पाटील पाचोरा आदी उपस्थित होते. नाना पाटील पुढे म्हणाले की, रविवार, दि. 27 रोजी ग. स. सोसायटी जनरल मीटिंग असून या मीटिंगमध्ये सभासद हितासाठी काही महत्वाचे निर्णय व्हावे,अशी मागणी आहे. एक तालुका, एक शाखा करा, नोकर भरती करू नका, सरसकट कर्जमाफी असावी, त्यातून आत्महत्या करणार्या सभासद यांना वगळू नका. (जामिनदार यांना ही त्रास होणार नाही), ग.स. कर्मचारी यांचा शिल्लक रजेचा पगार बंद करा, विशेष आणि जामीनकी कर्जावरील व्याजदर कमी करा आणि कर्ज मर्यादा वाढवा, 1200 रुपये मीटिंग भत्ता करा, 15 टक्के डिव्हिडंड करा,सोलर रुफ टॉप योजना राबवा, ग.स.सभासद यांच्या पाल्यांना परदेशी शिक्षणासाठी अत्यल्प व्याजदारावर शैक्षणिक कर्ज योजना राबवा,अशा मागण्यांचा समावेश आहे.
खाजगी प्राथमिक शिक्षक सोसायटी जळगाव यांचा व्याजदर कमी आहे. त्याच धर्तीवर जामीनकी व्याजदर 8%, विशेष 9%, वर्गणीवरील 7%, लाभांश 15%, मीटिंग भत्ता 1100 रुपये आहे. तसेच माध्यमिक शिक्षक सोसायटी जळगाव यांचा व्याजदरात जामीन 7.5%, विशेष 9%, वर्गणीवरील 6.50%, मीटिंग भत्ता 1000, लाभांश 15% आहे. याला एकमेव कारण आहे आणि ते म्हणजे पूर्ण जिल्हा कार्यक्षेत्रात एकच शाखा आहे. ग.स.सोसायटी आशिया खंडात सर्वात मोठी सोसायटी असूनही त्यांचा व्याजदर, मीटिंग भत्ता आणि लाभांश पहा. जामीन 9%, विशेष 10.50%, वर्गणीवरील 7.50% आणि लाभांश किती?, मीटिंग भत्ता किती? याचा अभ्यास करा. याचे कारण काय तर शाखा जास्त आहे. सभासदांची मागणी आहे की आपण माध्यमिक, भुसावळ आणि खाजगी शिक्षक सोसायटी यांच्यासारखी जिल्हा एक शाखा एक करू शकत नाही. पण तालुका एक, शाखा एक करा,अशी मागणी आहे.सर्व सभासद बंधू आणि भगिनी सर्वांनी ग. स. चा वार्षिक अहवाल काढा आणि शोधा शिल्लक रजेचा पगारासाठी यावर्षी किती रक्कम खर्च झाली आणि 2025-26 साठी किती तरदूत आहे. सन 2024-25 साठी 1 कोटी 4 लाख 95 हजार 327 रुपये कर्मचारी शिल्लक रजेचा पगारासाठी खर्च केली. सन 2025-26 साठी 1 कोटी 20 लाख रुपये कर्मचारी शिल्लक रजेच्या पगारांसाठी तरतूद आहे. मात्र,आता सभासदांना शिल्लक रजेचा पगार मिळतो का? असा संतप्त सवाल नाना पाटील यांनी उपस्थित केला.= सभासदांच्या जनजागृतीसाठी स्वाक्षरी मोहीम
सोसायटीचा खर्च कमी करण्यासाठी आणि एक तालुका, एक शाखा व अन्य मागण्यांचा ठराव रविवारी जनरल मीटिंगमध्ये मंजूर करून घ्या. अन्यथा सभासदांच्या हितासाठी दि. 27 रोजी जळगाव जिल्हा शिक्षक सेनेतर्फे ग.स. सभासद स्वाक्षरी अभियान राबविण्यात येणार असून सर्व सभासदांनी आपले मत कागदावर व्यक्त करून मागण्या मान्यतेसाठी आपला पाठिंबा द्यावा, असे आवाहनही जळगाव जिल्हा शिक्षक सेनेतर्फे करण्यात आले.