निवडणुकीचा काळात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल एपीआय प्रशांत कंडारे यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान..!

पाळधी,तालुका, धरणगाव- येथील पाळधी पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे यांनी निवडणुकीचा काळात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जळगाव पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी प्रशंसापत्र देऊन त्यांचा गौरव केला.
पाळधी गावाच्या हद्दीत 27 गावे तर एकूण 48 बूथ होते.
या सर्व बूथवर अचूक नियोजन ठेवत कुठेही वाद वगैरे होणार नाही याची काळजी घेणे तसेच अचूक माहिती वरिष्ठांना देणे कुठेही वाद वगैरे होणार नाही याची सर्व काळजी व उत्कृष्ट नियोजन करत मतदान अगदी शांततेत पाडल्याबद्दल त्यांचा हा गौरव करण्यात आला आहे.
हा गौरव माझा नसून माझ्या पाळधी दूरक्षेत्र च्या माझ्या सर्व सहकाऱ्यांनी साथ दिली त्यामुळे हे सर्व काही करू शकलो तसेच नागरिकांनी सहकार्य केले. त्यामुळे सर्व शक्य झालं मी सर्वांचे आभार मानतो असे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.
सदरचा गौरव झाल्याबद्दल सर्वत्र सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत कंडारे यांचं कौतुक केले आहे.