पाळधी पोलीस स्टेशन माध्यमातून अनोळखी मृत्य व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध..!

पाळधी तालुका धरणगाव- पाळधी खुर्द येथील त्रिवेणी कटलरी दुकानकच्या मागील नाल्याला भागाला लागून 60 वर्ष मृत्यू देह आढळल्याने संपूर्ण पाळधी शहरात धक्कादायक वातावरण निर्माण झाले होते.
पाळधी बु. ता. धरणगांव गावातील त्रिवेणी कटलरी दुकानाच्या मागे नाल्यालगत असलेल्या ग्रामपंचायत कॉम्प्लेक्स जवळ एक अनोळखी पुरुष जातीचा इसम वय अंदाजे 55 वर्षे हा मयत स्थितीत मिळून आला आहे. तरी सदर अनओळखी इसमाचे वर्णन खालील प्रमाणे
वर्णन- एक अनओळखी पुरुष जातीचा इसम वय अंदाजे 60 वर्षे वयोगटाचे नाव गाव समजुन आले नाही उंची अंदाजे 164 से.मी. डोक्याचे केस व दाढी वाढलेली, अंगाने अशक्त, अंगात काळया रंगाचे स्क्वेटर, पांढऱ्या रंगाचा मळकट शर्ट, ग्रे रंगाची पॅन्ट, Lux व्हिनस अंडर वियर घातलेली
पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत खंडरे यांचा मार्गदर्शनाखाली सदरचे प्रकरण पाळधी पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल विठ्ठल पाटील करीत आहेत.