माळी समाजाबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला त्वरित अटक करा आ,भा माळी महासंघाची मागणी..!
धरणगाव व पाळधी येथे अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीने दिले निवेदन

धरणगाव, प्रतिनिधी- कासोदा येथील एका तरुणाने माळी समाजाबाबत अतिशय खालचा स्तरावर जाऊन वक्तव्य करत त्याचा रील आपल्या सोशल मीडियावरील इंस्टाग्राम अकाउंटला लावला होता.
सदर पोस्ट जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सतीश अण्णा पाटील यांनी हेतू पुरस्कार माळी समाजाचा अवमान करण्याचा दृष्टिकोनातून त्या तरुणाचा instagram रील माजी पालकमंत्री सतीश पाटील यांचा इंस्टाग्राम अकाउंट ला अपलोड करण्यात आला.
सदर घटनेचा निषेधार्थ अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीने निवेदन धरणगाव पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक पवन देसले यांना देण्यात आले.

तर पाळधी येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे यांच्याकडे दिले
संबंधितांवर त्वरित अटक करत कारवाई करण्यात यावी अशी मागणी पत्रात केली आहे.
सदर व्यक्तीस त्वरित अटक न केल्यास माळी समाज पुढे वेगळे आंदोलन करेल याची आपण दक्षता घ्यावी व आमचा निवेदनाला मान देत आपण त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मागणी सदर पत्रात करण्यात आली आहे प्रसंगी अखिल भारतीय माळी महासंघाचे उत्तर महाराष्ट्र युवक युवक अध्यक्ष भूषण महाजन युवक ग्रामीण जिल्हाध्यक्ष अनिल माळी, तालुकाध्यक्ष किरण रावा माळी, शहर अध्यक्ष प्रणय माळी, आबा माळी, समाधान वाघ, ता. सरचिटणीस निलेश महाले, व्या. तालुकाध्यक्ष हेमंत महाजन, व्या. उपतालुकाध्यक्ष विजय जाधव,मल्लविद्या शहर अध्यक्ष चेतन माळी, विशाल सुभाष महाजन,सचिन महाजन, हिरालाल महाजन, सुनिल महाजन, रोहित महाजन, तर पाळधी येथे संजू महाराज,भैया महाजन, गौरव महाजन, दिलीप माळी, समाधान माळी, योगेश माळी उपस्थित होते.