ताज्या बातम्या
अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघाचा मंत्री गुलाबराव पाटील यांना जाहीर पाठिंबा..!

जळगाव- जळगाव ग्रामीण मतदारसंघातून शिवसेना महायुतीचे उमेदवार ना. गुलाबराव पाटील यांची उमेदवारी असून मंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून मतदार संघात गेल्या अनेक वर्ष पासून सुरू असलेल्या विकास कामांच्या तसेच सर्व जातीधर्मातील समाज बांधवांना सोबत घेऊन चालत असणाऱ्या व्यक्तिमत्वावर विश्वास ठेवत अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघाचा मंत्री गुलाबराव पाटील यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला.
पाठिंब्याचे पत्र मंत्री गुलाबराव पाटील यांचे ज्येष्ठ चिरंजीव प्रतापराव पाटील यांचा कडे सोपविण्यात आले.
अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघाचे राज्य संघटक मनोज भंडारकर यांच्या नेतृत्वात प्रमोद शिंपी, शरद सोनवणे, संजय शिंपी, सुभाष कापुरे, गणेश शिंपी, शिवदास मगन शिंपी, यांचा सह अन्य समाज बांधव उपस्थित होते.