ताज्या बातम्या

पाचोरा तालुक्यात २२७ वयोवृध्द व दिव्यांग मतदार यांनी केले गृह मतदान


 

पाचोरा,प्रतिनिधी -विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभुमीवर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार वयोवृध्द (८५ प्लस) व दिव्यांग (पी. डब्ल्यु. डी.) मतदार त्यांच्यासाठी मतदानापासून वंचित राहु नये या करीता गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने १८ – पाचोरा विधानसभा मतदार संघ अंतर्गत पी. डब्लु. डी. – ५५ व ८५ प्लस १८७ असे एकुण २४२ मतदार यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी १४ नोव्हेंबर व १५ नोव्हेंबर या दोन दिवशी गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. त्यानुसार १४ नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या २२३ गृह मतदानापैकी दिव्यांग (पी. डब्ल्यु. डी.) – ५० व वयोवृध्द (८५ प्लस) १६१ यांनी आपला मतदानाचा हक्क्क बजावला व उर्वरित शिल्लक १२ मतदारापैकी ७ मयत, ३ बाहेरगावी, १ नकार व १ दवाखान्यात दाखल आहे. तसेच १५ नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या १९ गृह मतदानापैकी दिव्यांग (पी. डब्ल्यु. डी.) – ५ व वयोवृध्द (८५ प्लस) – ११ असे एकुण १६ मतदार यांनी मतदानाचा हक्क बजावला उर्वरित ३ मतदार मयत आहेत. म्हणजेच २४२ पैकी १७२ वयोवृध्द (८५ प्लस) व दिव्यांग (पी. डब्ल्यु. डी.) ५५ अशा एकुण २२७ मतदार यांनी सदर कालावधीत गृह मतदान केले. या प्रक्रीयेसाठी १८ – पाचोरा विधानसभा मतदार संघ निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी भुषण अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार पाचोरा विजय बनसोडे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार भडगांव शितल सोलाट, सेक्टर ऑफीसर व त्यांच्या पथकातील नियुक्त कर्मचारी यांनी कामकाज केले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button