तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत धानोरा विद्यालयाच्या संघ विजयी
धानोरा ता. चोपडा .(प्रतिनिधी ) ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कुल व पंकज ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूल चोपडा येथील मैदानावर पार पडलेल्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या.१७ वर्ष आतील मुलांच्या कबड्डी स्पर्धेत २४ शाळेतील संघ सहभागी झाले होते. यात अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात धानोरा येथील झि.तो. महाजन माध्यमिक व ना.भा.पाटील ज्युनियर कॉलेज धानोरा विद्यालयाच्या संघाने पंकज माध्यमिक विद्यालय चोपडा संघाचा दणदणीत पराभव करून विजय मिळवला व जिल्हास्तरीय सामन्यांसाठी पात्र ठरलेला आहे. तर १७ वर्ष आतील मुलींच्या संपन्न झालेल्या कबड्डी स्पर्धेत विद्याभारती विद्यालय विरवाडे मुलींच्या संघाने विवेकानंद विद्यालयाचा पराभव करत अंतिम सामन्यात प्रवेश प्राप्त केलेला आहे. याप्रसंगी तालुका क्रीडा समन्वयक आर.पी.आल्हाट, तालुका क्रीडा अध्यक्ष अशोक साळुंखे, जगदीश जाधव, ललित सोनवणे, विजय पाटील, वासुदेव महाजन, भूषण गुजर, आदि उपस्थित होते.धानोरा विद्यालयाच्या कबड्डी संघाला क्रीडा शिक्षक वासुदेव महाजन, देविदास महाजन व माजी खेळाडू तोषल महाजन व सोहन महाजन यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या विजयी संघाचे विद्यालयाचे चेअरमन प्रदीप महाजन, शालेय समिती सदस्य बी. एस. महाजन,वामनराव महाजन, योगेश पाटील, सागर चौधरी, व्ही. सी.पाटील, अनिल महाजन, प्राचार्य के.एन.जमादार, उपमुख्याध्यापक नवल महाजन, सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
