ताज्या बातम्या

शिरसोली येथे घराला वीज जोडणीसाठी २० हजारांची लाच घेताना वायरमनला रंगेहाथ पकडले..!


 

जळगाव (प्रतिनिधी) :- घराचे बांधकाम पूर्ण झाल्यावर नवीन वीज कनेक्शन सुरु करण्यासाठी सुरुवातीला १० हजार रुपये देऊनही पुन्हा २० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या वरिष्ठ तंत्रज्ञाला जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना अटक केली आहे. त्याच्यावर एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

यातील जळगाव शहरात राहणाऱ्या ४८ वर्षीय तक्रारदार यांचे घराचे बांधकाम साईटचे काम पूर्ण झाल्यानंतर सदर ठिकाणी नवीन पोल टाकण्यात आले होते. (केसीएन)सदर पोल वरून विज कनेक्शन सुरु करण्यासाठी तक्रारदार हे महावितरण कार्यालय शिरसोली, जळगाव येथे वेळोवेळी गेले होते. वरिष्ठ तंत्रज्ञ विक्रांत अनिल पाटील देसले (वय ३८ वर्षे, शिरसोली युनिट रा .माऊली नगर, जळगांव) यांनी सदरचे काम करून देण्याचे मोबदल्यात ३० हजार रुपयेची लाचेची मागणी केली होती. पैकी १० हजार रुपये या अगोदर घेतले होते.

तरीपण विज कनेक्शन चालु करून देत नव्हते. ते विज कनेक्शन चालू करून देण्यासाठी उर्वरीत ठरलेले २० हजार रुपयांची लाचेची मागणी करीत होते. त्याबाबत तक्रारदार यांनी जळगाव येथील ला चलुचपत प्रतिबंधक विभाग येथे दि. १८ रोजी तक्रार दिली होती.सदर तक्रारीप्रमाणे पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी करण्यात आली.(केसीएन) त्यानुसार आज दि. ८ नोव्हेंबर रोजी वरिष्ठ तंत्रज्ञ अनिल देसले पाटील यांना उर्वरित २० हजार रुपये लाच रककम घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. त्यांच्या विरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई हि पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर,पीएसआय दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, पोना किशोर महाजन, पोकॉ/राकेश दुसाने यांनी केली आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button