किसान महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस साजरा

पारोळा —प्रतिनिधी
पारोळ्यात किसान महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस साफसफाई अभियान राबवून साजरा करण्यात आला
याबाबत अधिक माहिती अशी की
२४ सप्टेंबर हा राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो १९६९ मध्ये राष्ट्रीय सेवा योजनेची स्थापना करण्यात आली. युवकांना विद्यार्थी दशेतच सामाजिक आणि शैक्षणिक दृष्टी विकसित करण्याच्या हेतूने राष्ट्रीय सेवा योजनेची स्थापना करण्यात आली होती. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अंतर्गत किसान कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पारोळा राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने आज भुईकोट किल्ला आणि पारोळा शहरातील बाजारपेठ स्वच्छ करून हा राष्ट्रीय सेवा योजना दिवस साजरा करण्यात आला. यावेळी सकाळी किसान महाविद्यालयातून संपूर्ण शहरांमध्ये स्वच्छता ही सेवा या अंतर्गत स्वच्छते विषयी जनजागृती करणारे रॅली पारोळा शहरातून काढण्यात आली. ही रॅली किसान महाविद्यालय, पारोळा शहर बाजारपेठ मार्गे भुईकोट किल्ल्यामध्ये आली. भुईकोट किल्ला, मंदिर परिसर हा स्वच्छ आणि प्लास्टिक मुक्त करण्यात आला. पारोळा बाजारपेठ ते बालाजी मंदिर या मंदिरापर्यंतचा परिसर सुद्धा यावेळी स्वयंसेवकांनी स्वच्छ केला. या स्वच्छतेसाठी नगरपरिषद पारोळा यांनी सुद्धा या स्वच्छता मोहीमेत सहभाग नोंदवला. यावेळी वरिष्ठ पत्रकार भूपेंद्र मराठे, संजय पाटील, रमेश जैन, प्रतीक मराठे समाजसेविका सुवर्णा पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. स्वच्छता ही सेवा या उपक्रमासाठी राज्य संपर्क अधिकारी अजय शिंदे, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. सचिन नांद्रे, जिल्हा समन्वयक डॉ. दिनेश पाटील, प्राचार्य डॉ. वाय. व्ही. पाटील, उपप्राचार्य डॉ. जी. एच. सोनवणे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. या एकदिवसीय राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. प्रदीप औजेकर, प्रा. शिरीष सूर्यवंशी, प्रा. काकासाहेब गायकवाड, नपाचे श्रीमती यामिनी जटे, चंद्रकांत महाजन, अक्षय सोनवणे यांनी केले या शिबिरात एकूण १५५ स्वयंसेवकांनी सहभाग नोंदवला. पारोळा शहरात केलेल्या या स्वच्छतेच्या कार्याबद्दल माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कौतुक केले.