
चाळीसगाव-( प्रतिनिधी )
विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी माघारीच्या शेवटच्या दिवशी चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातील आठ उमेदवारांनी माघार घेतल्याने अंतीम लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. एकुण आठ जण विधानसभेच्या रिंगणात असून महायुती विरुद्ध मविआ अशी थेट लढत रंगणार आहे.
यानिवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. एकुण १९ जणांनी उमेदवारी दाखल केली होती. छाननी प्रक्रियेत तिघांचे अर्ज बाद झाल्याने १६ जण रिंगणात होते. माघारीच्या प्रक्रियेत सोमवारी विकास चौधरी, शरद सोनवणे, योगेश्वर राठोड, दिलीप पाटील, प्रकाश मोरे, रुपाली पाटील, मुखतारखान बिस्मिलाहखान कुरेशी, संपदा पाटील या उमेदवारांनी माघार घेतली.
आठ जण आखाड्यात
भाजप महायुतीकडून विद्यमान आ. मंगेश चव्हाण तर मविआकडून उबाटा गटाचे उन्मेष पाटील रिंगणात आहे. यासोबतचं बहुजन समाजपार्टीचे राजाराम मोरे, वाल्मिक गरुड, संदीप लांडे, किरण सोनवणे, मंगेश कैलास चव्हाण, सुनील मोरे यांची उमेदवारी कायम आहे.