राज्यस्तरीय सुगम संगीत गायन स्पर्धेत पंकज माध्यमिक विद्यालयाचा सुधिक्षण पाटील प्रथम
प्रतिनिधी ,चोपडा – बाबासाहेब के. नारखेडे स्मृती राज्यस्तरीय सुंगम संगीत गायन स्पर्धा भुसावळ येथे संपन्न झाली. या गीत गायन स्पर्धेत इयत्ता 5 वी ते 8 वी च्या गटात चि. सुधिक्षण सतिष पाटील ( इयत्ता 8 वी ) याने “आम्ही विठ्ठलाचे वारकरी” ह्या भक्तीगीताचे सुमधुर गायन करत उपस्थितांना मंत्रमुग्ध करत प्रथम क्रमांक पटकाविला. या गटात एकुण 25 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. सुधिक्षण पाटील याने अप्रतिम रित्या हार्मोनियमवर स्वतः वादन करून सुमधुर गायन केले. त्याच्या सुमधुर गायन आणि वादन चे कौशल्य पाहून उपस्थित रसिक भारावून गेले. राज्यस्तरीय स्पर्धेत कार्यक्रमाचे समारंभ अध्यक्ष मा. मकरंद वानखेडे होते तर प्रमुख अतिथी मा. डॉ. दिलीप देशमुख ( पुणे) व इतर मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, स्मृती चिन्ह, रोख रक्कम चे पारितोषिक प्रदान करण्यात आले. सुधिक्षण यास श्री. विनोद जाधव सरांचे सहकार्य लाभले.राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावल्या बद्दल चि.सुधिक्षण याचे कौतुक संस्थाध्यक्ष डॉ एस पी बोरोले , उपाध्यक्ष अविनाश राणे संचालक पंकज भैय्या बोरोले, नारायणदादा बोरोले , मुख्याध्यापक व्ही. आर. पाटील, सर्व शिक्षक व कर्मचारी वृंद यांनी केले.
