जामनेर येथे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी भरला उमेदवारी अर्ज

जामनेर,(प्रतिनिधी)विधानसभा मतदारसंघ निवडणुकीमध्ये राज्याचे ग्रामविकास तथा पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी आज दिनांक 29 रोजी सातव्यांदा आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यावेळी भारतीय जनता पार्टी प्रदेश चे अर्चना चिटणीस, खासदार रक्षा खडसे खासदार स्मिता वाघ आमदार किशोर आप्पा पाटील आमदार राजू मामा भोळे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते जामनेर तालुक्यातील हजारोच्या संख्येने नागरिक महिला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित झाले होते.
जामनेर शहरातील बाबाजी राघो मंगल कार्यापासून ते तहसील कार्यालयापर्यंत भव्य अशी रॅली काढून शक्ती प्रदर्शन करण्यात आले. जामनेर तालुक्यासह राज्यात महायुतीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामे झाली आहे त्याचबरोबर सर्वांच्या सुखदुःखात आम्ही नेहमी उपस्थित राहत असून यामुळे संपूर्ण राज्यातून एक लाखाचे लीड घेऊन आपण विजयी होऊ अशी प्रतिक्रिया उमेदवारी अर्ज दाखल बोलताना ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
विकासाला साथ,विजयाचा शंखनाद
जामनेर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या वतीने महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून मी निवडणूक उमेदवारी अर्ज आज दाखल केला. भाजपा तसेच महायुतीच्या सर्व घटकपक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून यासमयी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले.यावेळी ढोल ताशांच्या गजरात, वाजत गाजत मोठ्या उत्साहात भव्य मिरवणूक काढण्यात आली.
मागील सहा निवडणुकांमध्ये जामनेरकरांनी मला भरघोस मतांनी विजयी केलं. त्या बळावरतीच मी जामनेरकरांच्या सेवेस तत्पर राहू शकलो. गेल्या तीस वर्षांत जामनेरचा झालेला विकास आपण विकास कामांमध्ये लावलेला हातभार, याचा आनंद मोठा वाटतो.
याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे तसेच महायुतीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जामनेर विधानसभा मतदारसंघातील बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.