आमदार किशोर आप्पा पाटील यांचा समर्थनात माळी समाजाचे युवा कार्यकर्ते उतरले मैदानात..!

प्रतिनिधी / भडगाव – पाचोरा भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांचा समर्थनात समस्त माळी समाज बांधव यांचा माध्यमातून भडगाव तालुक्यात माळी संवाद दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
मागील कार्यकाळात किशोर आप्पांचा माध्यमातून तालुक्यातील माळी समाजाच्या विविध गावांना समाज मंदिरे तसेच सभा गृहांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिल्यावर बद्दल माळी समाज बांधवांचा माध्यमातून ऋणनिर्देश करण्यासाठी तसेच आगामी काळात भडगाव शहरात तसेच गावांसाठी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचे स्मारक येणार असल्याने सदरचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती माळी समाजाचे युवा नेते अनिल माळी (भुरा भाऊ) यांनी दिली आहे.
सदर दौरा भडगाव, कजगाव, भोरटेक, तांदलवाडी, बोरनार, वाडे, नावरे, वडगाव, पथराड कोळगाव, शिंदी,खेडगाव, यासह अन्य गावांमध्ये या संवाद मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे सदर मेळाव्यात मोठ्या प्रमाणात माळी समाज बांधव सहभागी होणार आहे.