पारोळा तालुक्यात शेतकऱ्याची आत्महत्या
पारोळा —प्रतिनिधी पारोळा तालुक्यातीलहिरापुर येथील शेतकर्यांने आत्महत्या केल्याची घटना घडली याबाबत अधिक माहिती अशी की पारोळा तालुक्यातील हिरापुर येथील महेंद्र विनायक सोनवणे या शेतकऱ्याने सततची नापिकी वअतिपावसामुळे यंदा ही उत्पन्न हातातून जाण्याची शक्यता असल्याने कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत असलेल्या शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. हि घटना हिरापूर शिवारात घडली सदरची घटना २२ सप्टेंबरच्या दुपारी उघडकीस आली. याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.महेंद्र विनायक सोनवणे (वय ३८) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. शेतीकाम करून ते परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. महेंद्र यांच्याकडे दोन बिघे जमीन आहे, त्यात यंदा कापसाच्या पिकाची लागवड केली होती. अतिपावसाने पीक खराब झाल्याने त्यातच आठ दिवसांपूर्वी त्यांच्या वडिलांनी काढलेले बँकेचे पीककर्ज भरण्याची नोटीस आली होती, सततची नापिकी व येणाऱ्या उत्पन्नाचा भरोसा न असल्याने, हात उसनवार व सरकारी बँकांचे कर्ज कसे फेडावे, या चिंतेत असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. सकाळी घरी कोणाला काही न सांगता ते घरातून निघून गेले. मात्र दुपारपर्यंत घरी न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला असता दुपारी दीडच्या सुमारास हिरापूर शिवारातील दत्तात्रय पाटील यांच्या विहिरीजवळ त्यांच्या चपला आढळून आल्या. ग्रामस्थांनी विहिरीत उतरून त्यांचा मृतदेह बाहेर काढला. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. पारोळा पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.