ताज्या बातम्या

जळगाव ग्रामीण मतदार संघातील छाननीत देवकरांचा उमेदवारी अर्ज ठरला अवैध..!


जळगाव / धरणगाव – संपुर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या विधानसभेच्या जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या विशाल देवकर यांचा अर्जला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अवैध ठरवला आला आहे.

जळगाव ग्रामीण मतदार संघ हा राज्यातील अतिशय चुरस ठरलेला मतदार संघ असून या मतदारसंघात मंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून विविध कामे करण्यात आले असून या मतदारसंघात अनेक इच्छुक उमेदवारांनी आपली उमेदवारी घोषित केली होती.

मात्र यामध्ये माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचे सुपुत्र विशाल देवकर यांचा एकमेव उमेदवारी उमेदवारी अर्ज बाद करण्यात आहे.

 

जाणून घ्या बाद करण्याचे कारण..?

११. श्री.विशाल गुलाबराव देवकर यांनी दि.२९/१०/२०२४ रोजी नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षामार्फत नामनिर्देशन पत्र सादर केलेले आहे. उमेदवार यांचे वय २५ वर्षापेक्षा जास्त असुन त्यांनी रक्कम रु.१०,०००/- अनामत रक्कम दाखल केलेली आहे. सदर नामनिर्देशन हे रक्कम रु.५००/- च्या स्टॅपवर केलेले आहे. उमेदवार यांचे नाव १४- जळगांव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीत समाविष्ट असुन नामनिर्देशन पत्रात भाग-१ मध्ये १ सुचक असुन सदरचे सुचक हे १४- जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघातील मतदार आहेत. नामनिर्देशन पत्रातील सर्व रकाने भरण्यात आलेली असुन भाग-३ व भाग- ३(अ) यावर उमेदवाराने स्वाक्षरी केलेली आहे. नामनिर्देशन पत्रासोबत नमुना नं. २६ सक्षम प्राधिका-या समक्ष सांक्षाकीत केलेले असुन शपथपत्राचे प्रत्येक पृष्ठावर नोटरीचा शिक्का व उमेदवाराने स्वाक्षरी केलेली आहे. उमेदवार हे लाभाचे पद धारण करीत नाहीत तसेच उमेदवार यांना शासकीय निवासस्थान संबधीत नादेय प्रमाणपत्र लागु नाही. उमेदवार यांचे विरुध्द कोणतेही फौजदारी गुन्हे दाखल / प्रलंबित असुन तसेच कोणत्याही कायद्याने दोष सिध्दी झालेली नाही. उमेदवार यांनी निवडणुक निर्णय अधिकारी यांचे समक्ष नामनिर्देशन पत्र दाखल करतांना शपथ घेतलेली आहे. उमेदवार यांनी फॉर्म ए बी फॉर्म सादर केलेला नाही तसेच नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षामार्फत गुलाबराव बाबुराव देवकर यांना ए बी फॉर्म देण्यात आलेला असुन त्यांचा नामनिर्देशन पत्र वैध करण्यात आलेले असल्याने श्री विशाल गुलाबराव देवकर यांना ए बी फॉर्म लागु नाही त्यामुळे त्यांचे नामनिर्देशन अपक्ष म्हणुन गृहित धरण्यासाठी १० सुचकांची आवश्यकता असल्याने त्यांचे नामनिर्देशन पत्रात एकच सुचक असल्याने सर्व पात्रता धारण करीत नसल्याने त्यांचे नामनिर्देशन पत्र अवैध ठरविण्यात येत असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

तर यांचे अर्ज ठरले वैध 

अनिता सुनील सोनवणे, बहुजन समाज पार्टी

गुलाबराव बाबुराव देवकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार

गुलाबराव रघुनाथ पाटील, शिवसेना

मुकुंद आनंद रोटे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना

किशोर मधुकर झोपे, हिंदुस्थान जनता पार्टी

प्रवीण जगन सपकाळे, वंचित बहुजन आघाडी,

योगेश एकनाथ कोळी, लोकराज्यम पार्टी,

अपक्ष उमेदवार

गुलाबराव रघुनाथ पाटील,

निलेश सुरेश चौधरी

प्रतापराव गुलाबराव पाटील

प्रसाद लीलाधर तायडे

भगवान दामू सोनवणे

भरत देवचंद पाटील

मुकेश मूलचंद कोळी

रियाज सादिक देशमुख

शिवाजी महारु हटकर

सोनी संतोष नेटके

असे दहा अपक्ष उमेदवार आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button