नवदृष्टी मिळालेल्या वृद्ध महिलेसोबत ना. गुलाबराव पाटील यांनी साधला अहिराणी भाषेतून संवाद..!
भाऊ मी दामोताबाई बोलते आहे म्हणत महिलेने मानले पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार..!

पाळधी, तालुका/ धरणगाव- ना. गुलाबराव पाटील यांच्या मार्गद्शनाखाली जीपीएस मित्र परिवार व शंकरा आय हॉस्पिटलच्या माध्यमातून गेल्या काही महिन्यापासून परिसरात मोतीबिंदू तपासणी शिबिरांचे आयोजन सुरू आहेत व या शिबिरांचा माध्यमातून शेकडो लोकांना नवदृष्टी देण्याचे काम सुरू आहे.
यामध्ये अनेक गोरगरीब लोकांना नवदृष्टी देण्याचे काम या माध्यमातून होताना दिसत आहे.
तसेच अहिरे खुर्द येथील दामोताबाई धुरकर या भिल्ल समाजाचा वृद्ध महिलेला गेल्या चार ते पाच महिन्यांपासून दोघेही डोळ्यांनी काहीच दिसत नव्हते याची माहिती शिवसेना कार्यकर्ते पवन पाटील यांना मिळाली त्यांनी लगेच माजी जि प सदस्य प्रतापराव पाटील यांना रुग्णाची संपूर्ण माहिती दिली. प्रसंगी प्रतापराव पाटील यांनी या वृद्ध महिलेला शिबिरात घेऊन येण्याची सूचना केली.
महिलेला शिबिरात डॉक्टरांनी तपासणी करून तत्काळ त्यांना ऑपरेशनचा सल्ला दिला व त्यांना तत्काळ पनवेल येथील शंकरा आय हॉस्पिटल ला भरती करून एका डोळ्याची शस्त्रक्रिया करण्यात आली
वृद्ध महिलेला दोघेही डोळ्याने दिसत नसल्याने आता एकाच डोळ्याचा ऑपरेशन करण्यात आले असल्याचे प्रतापराव पाटील यांना कळाले त्यांनी तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधत पेशंट बाबत चर्चा केली त्या डॉक्टरांनी सांगितलं की आपण एकाच वेळी दोघं डोळ्यांचे ऑपरेशन करू शकत नाही आपल्याला दीड ते दोन महिन्याचा अंतर ठेवावा लागेल त्यामुळे आता दोघही डोळ्यांनी दिसत नसलेल्या महिलेला आता तिचा एक डोळ्याचा माध्यमातून तिला नव दृष्टी देण्याचं काम पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून झाले.
त्याबाबत महिलेने थेट पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत अहिराणी भाषेत संवाद साधत त्यांचे आभार मानले व प्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांनी संपूर्ण विचारपूस केली त्या ठिकाणी दवाखान्यात ट्रीटमेंट कशी मिळाली संपूर्ण व्यवस्था झाली का तसेच दुसऱ्या डोळ्याचे ऑपरेशन लवकरच करून टाकू असे त्या महिलेस आश्वासित केले.