ताज्या बातम्या

नगरपंचायत मध्ये नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या खुर्चीला नगरसेवकांनी हार घालत केला निषेध व्यक्त


 

बोदवड:-  नगरपंचायत बोदवड येथे सर्व साधारण सभेला नगराध्यक्ष व मुख्याधिकारी अनुपस्थित असल्यामुळे व कुठल्याच प्रकारची पूर्व सूचना न देता सर्व साधारण सभा रद्द केल्यामुळे विरोधी व सत्ताधारी यात चौदा नगरसेवकांनी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या खुर्चीला हार घालून संताप व्यक्त केला.

सर्व साधारण सभे मध्ये नवनिर्वाचित नगरसेविका प्रभाग चार नगरसेविका सय्यद रुबिणाबी हारून यांचा सत्कार सर्वसाधारण सभेमध्ये होणार होता व शहरातील काही प्रभागातील विकासाची कामे याबाबत सर्व साधारण सभा आयोजित करण्यात आली होती सात दिवसागोदर सर्व नगरसेवकांना सर्वसाधारण सभेला उपस्थित राहण्यासाठी पत्र पाठविण्यात आले होते त्यामुळे बोदवड नगरपंचायत कार्यालयात सोळा पैकी चौदा नगरसेवक उपस्थित होते मुख्याधिकारी व नगराध्यक्ष उपस्थित नसल्याने सर्वसाधारण सभा रद्द करण्यात आली मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांच्या भोंगळ कारभारामुळे व कुठल्याच गोष्टीत विश्वासात घेत नसल्यामुळे विरोधी नगरसेवक व सत्ताधारी नगरसेवक यांनी खुर्चीला हार घालून निषेध व्यक्त केला

यावेळी उपनगराध्यक्ष रेखा संजय गायकवाड,विरोधी गटनेते जाफर शेख,नगरसेवक विजय बडगुजर, नगरसेवक हाजी सईद बागवान,सत्ताधारी उपगटनेते बेबिबाई माळी,नगरसेविका बेबीबाई चौहान,नगरसेवक मुजममिल शेख,नगरसेविका सय्यद रुबिनाबी हारून,नगरसेविका पूजा पारधी,नगरसेविका योगिता गोपाल खेवलकर, नगरसेविका पूजा बरडिया, नगरसेविका एकताबी,स्वीकृत नगरसेवक दीपक झांबड,उपस्थित होते

 

नगराध्यक्ष आनंदा पाटील यांची प्रतिक्रिया*:- काही नगरसेवक माझ्या आजारपणाचा राजकारण करत असल्याची खंत.

 

विरोधी गटनेते जाफर शेख*: कुठल्याच प्रकारची माहिती न देता सर्वसाधारण सभा रद्द करण्यात आली सभेमध्ये शहरातील घर पट्टी व पाणी पट्टी वरील टॅक्स कमी करण्यात यावा हा विषय सर्वसाधारण सभेत मांडायचा होता म्हणून निषेध करण्यात आला

 

सत्ताधारी नगरसेवक हाजी सईद बागवान:- मुख्याधिकारी,नगराध्यक्ष विकासकामांच्या दृष्टीकोनातून विश्वासात घेत नाही सर्व निर्णय परस्पर निर्णय घेत असतात


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button