ताज्या बातम्या

म्हसावद – बोरणार जिल्हा परिषद गटात गुलाबराव पाटलांना प्रचंड प्रतिसाद !

लाडक्या बहिणींनी केल औक्षण : कार्यकर्त्यांचा उत्साह


म्हसावद/जळगाव  – शिवसेनेचे नेते व मंत्री, महायुतीचे उमेदवार गुलाबराव पाटील यांनी म्हसावद – बोरणार जिल्हा परिषद गटात प्रचाराला जोमाने सुरूवात केली आहे. या गटातील म्हसावद, बोरणार, लमांजन, कुऱ्हाळदे, बिलवाडी, डोमगाव, बिलखेडा, वावडदा या गावात त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत असून, ज्येष्ठांनी त्यांना आशीर्वाद दिले तर गावातील महिलांनी महायुतीचे उमेदवार गुलाबभाऊंचे औक्षण करून त्यांचे स्वागत केले.

 

गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या निवडणूक प्रचारा दरम्यान म्हसावद, बोरणार, लमांजन, कुऱ्हाळदे, बिलवाडी, डोमगाव, बिलखेडा,

वावडदा या गावांमध्ये जाऊन थेट जनतेशी संवाद साधला. त्यांच्या प्रचार रॅलीत जेष्ठांसह महिलांचा आणि तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून येत आहे. प्रत्येक गावांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. अनेक ठिकाणी ज्येष्ठांनी त्यांना आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या, तर महिलांनी औक्षण करून त्यांचा सन्मान केला. म्हसावद – बोरणार या जिल्हा परिषद गटात गुलाबराव पाटील यांचेवर नागरिकांचे असलेले प्रेम आणि विश्वास हे त्यांच्या विजयाची खात्री देणारे दिसून आले.

 

 

आजचा प्रचार दौरा : भोकर कानळदा जि. प. गट

आव्हाणे येथे सकाळी 8.00 वा., खेडी खु. स. 10:00 वा,वडनगरी स. 11:00 वा, फुपनगरी दुपारी 12: 00, त्यानंतर कानळदा येथे दुपारी 12.00 ते 1:30 वाजेपर्यंत विश्रांती राहणार असून कूवारखेडे येथे दुपारी 2:30 वा, कानळदा दुपारी 3.00 वा., नांद्रा बु सायंकाळी 5.00 प्रचार रॅली असल्याने जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महायुती मार्फत करण्यात आले आहे.

 

 यांची होती प्रमुख उपस्थिती

यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, सेनेचे जिल्हा प्रमुख निलेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, सचिन पवार,भाजपाचे भाऊसाहेब पाटील, रामचंद्र पाटील, रवी पाटील, प्रदीप पाटील, उपसभापती साहेबराव वराडे, दूध संघाचे रमेशआप्पा पाटील, उपजिल्हाप्रमुख अनिल भोळे, रवींद्र कापडणे, तालुकाप्रमुख शिवराज पाटील, अर्जुन पाटील, सचिन पाटील, सरपंच ललित साठे, जळके सरपंच राजूभैय्या पाटील, चंद्रशेखर पाटील, नारायण चव्हाण, सरपंच गोविंद पवार, समाधान चिंचोरे, शितलताई चिंचोरे, जेष्ठ शिवसैनिक विष्णूआप्पा चिंचोरे, धोंडूभाऊ जगताप, दीनोद पाटील, समाधान पाटील, सुनील बडगुजर, सुनिल मराठे, मार्केटच्या यमुनाबाई सपकाळे, उपतालुका प्रमुख मंगलाताई गोपाळ, अनिता चीमनाकरे, पी. के. पाटील, जितू पाटील, ज्ञानेश्वर चव्हाण, राष्ट्रवादी, भाजपा व शिवसेना – रीपाई महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button