जळगाव
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी धर्मराज मोरे नियुक्त.!

धरणगाव,- येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार धर्मराज मोरे यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या धरणगाव तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
धर्मराज मोरे यांचा पत्रकारिता क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव तसेच संघटनेत सदस्य म्हणून केलेल्या कामांचा आढावा घेत
राज्य अध्यक्ष वसंत मुंडे, राज्य संघटक संजय भोकरे, प्रदेश सरचिटणीस विश्वास आरोटे, प्रदेश कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे, यांच्या आदेशाने जिल्हाध्यक्ष भूषण महाजन यांनी त्यांची नियुक्ती केली.
प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष गोपाल सोनवणे, शहराध्यक्ष अविनाश बाविस्कर. किरण सोनवणे .राजेंद्र रडे उपस्थित होते.